जॉबसाठी CV पाठवावा की Resume? हा आहे फरक
कोणत्याही कंपनीत जॉब मिळवायचा म्हंटलं तर त्या आधी Resume किंवा CV पाठवावा लागतो.
बायोडेटा बनवताना त्यावर Resume किंवा CV असं काहीही हेडिंग लिहितो. मात्र या दोघांमध्ये फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
नोकरीच्या टाइपनुसार Resume पाठवावा की CV हे ठरवलं जातं. आज आम्ही तुम्हाला या दोघांमधील फरक सांगणार आहोत.
CV मध्ये, उमेदवार त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल आणि व्यावसायिक इतिहासाबद्दल माहिती देतात.
Resume मध्ये उमेदवार त्यांचा कामाचा अनुभव तपशीलवार सांगतात.
CV चा वापर शैक्षणिक पदाच्या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी केला जातो,
Resume तुम्ही कोणत्याही फील्ड जॉबसाठी अर्ज करू शकता.
सीव्हीमध्ये सर्व माहिती असते, त्यामुळे ती अनेक पानांमध्ये बनवली जाते,
तुमची कौशल्ये आणि कामाचा अनुभव रेझ्युमेमध्ये नमूद केलेला असतो, त्यामुळे त्याची लांबी कमी असते.
सीव्ही तुमच्याबद्दल माहिती देतो तर रेझ्युमे तुमच्या क्षमतेबद्दल सांगतो.
त्यामुळे यापुढे जॉबसाठी बायोडेटा पाठवताना आपण हेडिंग काय लिहित आहे याकडे लक्ष नक्की द्या.