CRPF मध्ये तब्बल 1458 जागांसाठी मेगाभरती 

केंद्रीय रिजर्व पुलिस बल इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) या पदांच्या 1458 जागांसाठी  ही भरती असणार आहे. 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो (ASI Steno) - 29,200/- – 92,300/- रुपये प्रतिमहिना,
 हेड कॉन्स्टेबल मंत्रिपद (HC Ministerial) - 25,500/- – 81,100/- 

शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र ही कागदपत्रं आवश्यक असतील. 

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट बघा 

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://crpf.gov.in/recruitment.htm या लिंकवर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 असणार आहे.