8वीतल्या अभयची कमाल!
करणार ISRO ची
वारी

Heading 3

शालेय विद्यार्थ्यांनी 'नासा' (NASA) आणि 'इस्रो' (ISRO) या अवकाश संशोधन संस्था पुस्तकातूनच अभ्यासलेल्या असतात.

पण बीडमधील शालेय विद्यार्थ्यांना या संस्था प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे

जिल्हाभरातील 110 विद्यार्थ्यांतून 33 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून 11 विद्यार्थी 'नासा' तर 22 विद्यार्थी 'इस्रो'ला जाणार आहेत. 

बीड जिल्हा स्तरावर झालेल्या निवड चाचणी परीक्षेतून 33 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील पालीच्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी अक्षय वाघमारे याची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे.

अभय हा सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असून तो इस्रोला जात असल्याने गावात उत्साह आहे. 

बीड येथे झालेल्या अंतिम परीक्षेत त्याला 58 गुण मिळाले आहेत. 

त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत असून त्याला शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन लाभलं आहे. 

त्यामुळे आता अभय हा इतर विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा असणार आहे.