पोलीस भरतीवेळी या चुका कधीच करू नका

महाराष्ट्रात तब्बल 18,000 पेक्षा अधिक जागांसाठी पोलीस मेगाभरती होणार आहे. 

या पोलीस भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया झाली झाली आहे आणि शारिरीक परीक्षा सुरु आहेत. 

याच पार्श्वभूमीवर पोलीस भरतीच्या शारीरिक परीक्षेला जाताना कोणत्या चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतं हे जाणून घेऊया. 

पोलीस भरतीला जाताना कुठल्याही प्रकारचे स्टिरॉईड्स घेणं किंवा इंजेक्शन घेणं तुम्हाला महागात पडू शकतं. 

तसंच पोलीस भरतीला जाताना काही महत्वाची कागदपत्रं घेऊन जाणं आवश्यक आहे ती विसरू नका.

भरती परीक्षेदरम्यान काही चूक झाल्यास कोणाशीही वाद घालू नका यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. 

भरती परीक्षेदरम्यान आवश्यक शूज आणि आवश्यक गणवेश घालायला विसरू नका. 

भरतीला जाताना वेळेचं भान असणं खूप महत्वाचं आहे. भरती चाचणीच्या अर्धा तास आधी पोहोचा. 

सर्वात महत्वाचं भरतीदरम्यान आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. जॉब तुम्हालाच मिळेल.