जॉब करताना अनेकांना चांगल्या संधी चालून येतात आणि त्यामुळे जॉब सोडण्याचा आपण निर्णय घेतो.
पण जॉब सोडण्याआधी काही गोष्टी न केल्यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे Resign केल्या केल्या पुढील गोष्टी करणं आवश्यक आहे.
रिझाईन केल्यानंतर काही दिवसातच तुमच्या जॉब प्रोफाईलविषयी संपूर्ण माहिती लिहून काढा. पुढे कामात येईल.
नोटीस पिरेडवर असताना तुमच्या HR कडून आवश्यक ती सर्व सर्टिफिकेट्स घेऊन ठेवा.
तुमच्या जुन्या कंपनीचं PF अकाउंट येणाऱ्या नवीन कंपनीच्या PF अकाउंटसोबत जोडायला विसरू नका.
नवीन कंपनीत देण्यासाठी जुन्या कंपनीकडे असलेली तुमची आवश्यक कागदपत्रं घ्यायला विसरू नका.
जुन्या कंपनीतील बॉस आणि काही सहकाऱ्यांचे रेफरन्स घेऊन ठेवा जे तुम्हाला कामी येतील.
तुमचं Leaving Certificate आणि Experience Certificate घ्यायला अजिबात विसरू नका.