असे व्हा सेलिब्रिटीजचे पर्सनल बॉडीगार्ड्स 

आपल्या देशात सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटीजचं आयुष्य याबद्दल कोट्यवधी लोकांना उत्सुकता असते.

प्रश्न उभा राहतो त्या सेलिब्रिटीच्या सुरक्षेचा. म्हणूनच या सिलेब्रिटीजसाठी बॉडीगार्डस असतात. 

अनेकांना असं वाटतं आपणही सेलिब्रिटीजचे बॉडीगार्डस झालो तर? पण असे बॉडीगार्ड्स होणं  सोपं नाही. 

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सिलेब्रिटीजचे बॉडीगार्ड्स कसं होता येईल? हे सांगणार आहोत. 

सिलेब्रिटीजचे बॉडीगार्ड्स होण्यासाठी असं काही ठरलेलं शिक्षण नाही. किमान बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण असावं. 

उमेदवारांना काही प्रकारचे विशेष पोलिस किंवा लष्करी प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. 

उमेदवारांकडे सरासरीपेक्षा जास्त सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता असणे आवश्यक आहे. 

बॉडीगार्ड हा जनसंपर्कातही चांगला असला पाहिजे आणि फिल्डवर काम करणाऱ्या प्रत्येक गार्डसाठी ते आवश्यक आहे. 

बॉडीगार्ड्स होण्यासाठी आणीबाणीच्या प्रसंगी सुटण्याचा मार्ग काढता येणं आवश्यक आहे. 

क्लायंटला धोका जास्त असेल तर वेतनश्रेणीही जास्त असू शकते. शिफ्ट दिवसातील 8 ते 12 तासांपर्यंत असते.