स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे उपाय कराच 

आजकाल बहुतेक मुलं तक्रार करतात की त्यांनी काय वाचलं ते आठवत नाही. 

तुम्ही अनेकदा मुलांना असे म्हणताना ऐकू शकता की त्यांनी काही काळापूर्वी काहीतरी वाचले होते पण आता ते आठवत नाही. 

गेमिंग आणि मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांची स्मरणशक्ती कमकुवत होते, असे मानले जाते. 

परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी तुम्ही जे वाचले ते लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे

जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा हातात पेन्सिल ठेवा. ज्या गोष्टी तुम्ही अंडरलाईन कराल त्या लक्षात राहतील. 

इतरांच्या नोट्स वाचण्यात जास्त वेळ लागतो आणि समज कमी होते. अभ्यास करताना नोट्स स्वतः तयार कराव्यात.

आपण मित्रांसोबत काय बोललो ते आपल्या सर्वांना आठवते. म्हणूनच मित्रांसोबत ग्रुप स्टडी करा. 

सतत वाचनामुळे अनेक वेळा गोष्टी लक्षात राहत नाहीत. ब्रेक घेतल्याने एकाग्रता टिकून राहते. 

तुम्ही वाचलेल्या गोष्टींची एकावेळी उजळणी करत रहा. उजळणीमुळे गोष्टी मनामध्ये बसतात.