दिवस मावळल्यानंतर केस विंचरू नयेत?

हिंदू धर्मात प्राचीन काळापासून अशी काही कामे आहेत, जी सूर्यास्तानंतर करणे शुभ मानले जात नाही. 

यापैकी एक म्हणजे सूर्यास्तानंतर महिलांनी केस विंचरणे. सध्याच्या युगातही प्राचीन काळापासून चालत आलेल्या काही परंपरा आणि श्रद्धा आजही मानल्या जातात.

शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर महिलांनी केस मोकळे सोडणे आणि विंचरणे अशुभ मानले गेले आहे.

सूर्यास्तानंतर महिलांनी संध्याकाळी केस धुवू नयेत. संध्याकाळी महिलांनी मोठे केस असतील तर बांधून ठेवणेच चांगले मानले जाते. 

असे मानले जाते की, सूर्यास्तानंतर नकारात्मक शक्ती वातावरणात राहतात, त्यामुळे जर महिलांनी केस विंचरले किंवा रात्री केस मोकळे सोडले तर या नकारात्मक शक्तींचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो.

महिलांना रात्री सूर्यास्तानंतर तुटलेले केस घराबाहेर फेकू नयेत. याविषयी असे सांगितले जाते की...

रात्रीच्या वेळी तुटलेल्या केसांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून कोणी तुमच्यावर जादूटोणा करू शकतो. रात्री घराबाहेर फेकलेल्या केसांमुळे तुम्हाला नाहक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

महिलांना नेहमी रात्री केस बांधण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की, सूर्यास्तानंतर केस मोकळे सोडणे कुटुंबासाठी चांगले नाही.

याशिवाय रात्री केस विंचरताना महिलेच्या हातून कंगवा खाली पडला तर अशुभ वार्ता ऐकायला मिळते असे मानले जाते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here