आपल्या जीवनाशी संबंधित अशी अनेक कामे सांगितली आहेत, जी काही विशिष्ट दिवशी किंवा वेळी करणे निषिद्ध मानले जाते.
संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेला झोपू नये, असे म्हणतात. या वेळात आजारी व्यक्तीनंही थोडावेळ उठून बसावं, असा आग्रह केला जातो.
तुम्ही कधी विचार केला आहे का की, संध्याकाळी झोपू नये असे, घरातील वडीलधारी माणसं का सांगत असावीत? त्याला काय कारण आहे.
ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा संध्याकाळच्या वेळी का झोपू नये यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण सांगत आहेत.
धार्मिक शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळचा वेळ अत्यंत शुभ मानला जातो, कारण सकाळ ही देवाची पूजा करण्याची वेळ असते.
संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता दुर्गा या तीन देवी आपल्या घरी येतात, असे शास्त्रात सांगितले आहे.
या दरम्यान जर एखादी व्यक्ती झोपत असेल तर तो या तीन देवींच्या आशीर्वादापासून वंचित राहतो, असे मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी घराचे दरवाजे उघडे ठेवून देवी लक्ष्मीचे स्वागत केले जाते.
संध्याकाळच्या वेळी तुमच्या घराचे दरवाजे बंद असतील तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करू शकणार नाही
आपण संध्याकाळी झोपलो तर आपण भविष्यासाठी नियोजन करू शकत नाही, ज्यामुळे आपली अनेक कामे बिघडू शकतात
वैद्यकीय शास्त्रानुसार, जर तुम्ही संध्याकाळी झोपलात तर तुमचे संपूर्ण जीवन चक्र विस्कळीत होते, ज्यामुळे रात्रीची झोप देखील भंग पावते.
तिन्ही सांजेला झोपले तर रात्री उशिरा झोप लागेल, त्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो, ज्याचा आपल्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो.
(सूचना : येथे दिलेली काही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ
Click Here