हिंदू धर्मात प्राचीन काळापासून सिद्धी आणि दैवी ज्ञानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सिद्धी या शब्दाचा अर्थ सिद्धी प्राप्त करणे असा आहे.
हिंदू धर्मग्रंथांनुसार, बजरंगबली हे महादेवाचे 11 वे अवतार, अष्ट सिद्धी आणि नवनिधी दाता म्हणून ओळखले जातात.
गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या हनुमान चालिसाच्या एका ओळीत असे म्हटले आहे. "अष्ट सिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता".
या दोह्यात ज्या सिद्धींबद्दल सांगितले आहे, त्या अतिशय चमत्कारिक शक्ती आहेत आणि या आठही सिद्धी हनुमानाला वरदान म्हणून प्राप्त झाल्या आहेत.
अनिमा- अनिमा सिद्धीच्या आधारे हनुमान कधीही अतिशय सूक्ष्म रूप धारण करू शकतात. ही सिद्धी हनुमानाने महासागर पार करून लंकेत पोहोचल्यानंतर वापरली होती.
महिमा- महिमा सिद्धीच्या मदतीने हनुमान आपले शरीर विशाल करू शकतो. ही पद्धत हनुमानाने लंकेला जाताना समुद्र ओलांडताना वापरली होती.
गरिमा- या सिद्धीच्या साहाय्याने हनुमान स्वतःचे वजन मोठ्या पर्वतासारखे वजनदार करू शकत होते. ही सिद्धी महाभारत काळात हनुमानाने भीमासमोर वापरली होती.
लघिमा - या सिद्धीमुळे हनुमान स्वतःचा भार पूर्णपणे हलका करू शकत होते आणि ते एका क्षणात कुठेही जाऊ शकतात. हनुमान अशोक वाटिकेत होते, तेव्हा त्यांनी अनिमा आणि लघिमा सिद्धी वापरली
प्राप्ती - या सिद्धीद्वारे हनुमानाला लगेच काहीही मिळू शकते. प्राणी पक्ष्यांची भाषा समजू शकत होते आणि भविष्य देखील पाहू शकतात.
प्राकाम्य- या सिद्धीच्या मदतीने आकाशात ऊंच झेप घेऊ शकत होते आणि हवे तितके दिवस पाण्यात जिवंत राहू शकत होते. या सिद्धीमुळे हनुमान कायम तरुण राहू शकतात.
ईशित्व- या सिद्धीद्वारे हनुमानाला अनेक दैवी शक्ती प्राप्त झाल्या. या सिद्धीच्या प्रभावाने हनुमानाने संपूर्ण वानरसेनेचे कुशलतेने नेतृत्व केले होते.
वशित्व- या सिद्धीमुळे हनुमान जितेंद्रिय आहेत आणि आपल्या मनावर-भावनेवर नियंत्रण ठेवू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)