हिंदू धर्मात भगवान महादेवाच्या उपासनेला खूप धार्मिक महत्त्व आहे. महादेवाला अनेक नावांनी ओळखलं जातं.
असे मानले जाते की, खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांवर भोलेनाथ लगेच प्रसन्न होतात.
महादेवाला काही प्रिय वस्तू अर्पण केल्या जातात. जलाभिषेक, दुग्धाभिषेक, फुले याबरोबरच बेलपत्रही महादेवाला अतिशय प्रिय आहे.
महादेव साध्या भक्तीनंही प्रसन्न होतात. कलशातून पाणी आणि बेलपत्र अर्पण करून तुम्ही महादेवाची कृपा मिळवू शकता.
महादेवाच्या पूजेत बेलपत्र आवर्जुन अर्पण केलं जातं. शंकराला बेलपत्र का अर्पण केलं जातं, जाणून घेऊ.
समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर पडले. हे विष इतके प्रभावी होते की त्याने संपूर्ण विश्वात हाहाकार माजवला.
त्या विषाच्या घातक परिणामापुढे सर्व देवसुद्धा हीनदीन दिसू लागले. त्या विषाचा प्रभाव थांबवण्याची ताकद कोणाचीच नव्हती.
त्यावेळी जगाला वाचवण्यासाठी महादेवाने ते सर्व विष प्राशन केलं आणि ते आपल्या घशात ठेवलं.
विषाच्या प्रभावाने भगवान शंकराचा कंठ निळा झाला. तेव्हापासून त्यांचे नावही नीलकंठ झाले.
विषाच्या अत्यंत घातक परिणामामुळे भगवान शिवाचे शरीर तापू लागले आणि ते खूप गरम झाले. त्यामुळे आजूबाजूचे वातावरणही पेटू लागले.
पौराणिक मान्यतेनुसार बेलपत्र विषाचा प्रभाव कमी करते. त्यामुळे देवतांनी शिवाला बेलपत्र खाऊ घालायला सुरुवात केली.
तेव्हापासून भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे. ज्याचे आजपर्यंत पालन केले जात आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात घराबाहेर
Click Here