गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खातात

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा आरंभ.

वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आपल्याकडे थाटामाटात साजरा केला जातो.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजण्यात येणारा असा हा गुढीपाडवा घराघरात गुढी उभारून साजरा केला जातो.

या दिवशी या गुढीला कडुलिंबाचा टाळाही बांधला जातो.

अनेक घरांमध्ये कडुलिंबाचा पाला खाण्याचीही पद्धत आहे

कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावली जातात.

त्यामुळे घरात येणाऱ्या रोगजंतूंना अटकाव होतो आणि कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहाते.

वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे कडूलिंबाचा उपयोग केला जातो. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)