झोपताना उशीखाली या वस्तू ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक वस्तूची स्वतःची वेगळी ऊर्जा असते आणि त्याचा घरातील सदस्यांवर प्रभाव पडत राहतो. 

काही गोष्टी आहेत, ज्याचा योग्य वापर न केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि माता लक्ष्मी निघून जाऊ शकते.

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या उशीखाली ठेवू नयेत, ज्याचा परिणाम व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावरही होतो. पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून याविषयी जाणून घेऊ.

वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, कोणत्याही व्यक्तीने उशीखाली पर्स ठेवून झोपू नये. मान्यतेनुसार, पर्समध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो.

पर्स/पाकिटामध्ये माता लक्ष्मीचे स्थान आहे. उशीखाली ठेवून झोपल्याने अनावश्यक खर्च वाढतो. यासोबतच कुटुंबातील गोडवा कमी होतो.

घड्याळ उशीखाली ठेवून झोपल्याने झोपेचा त्रास होतो, असे वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात. याशिवाय, बरेच लोक इलेक्ट्रॉनिक घड्याळेही वापरतात..

अशा घड्याळांमधून बाहेर पडणाऱ्या लहरी व्यक्तीच्या मनावर आणि हृदयावर परिणाम करू शकतात. या लहरी बेडरूममध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवू शकतात.

आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपताना पुस्तक वाचण्याची आवड असते. अनेक वेळा पुस्तक वाचताना आपण ते उशीवर किंवा खाली ठेवतो...

उशीखाली पुस्तके ठेवल्यानं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते असे वास्तुशास्त्राचे मत आहे. व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

वर्तमानपत्र, पुस्तके, मासिके बुध ग्रहाशी संबंधित मानली जातात. त्यामुळे बुध ग्रहाचा प्रभाव एखाद्या व्यक्तीवर वाढल्यास त्याचा बुद्धिमत्तेसोबतच करिअरवरही परिणाम होतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ

Click Here