Gudi Padwa 2023: मराठी नववर्ष, काय आहे गुढीपाडवा सणाचं महत्त्व? कसा साजरा होतो सण

हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते.  गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. 

गुढीपाडव्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेऊ या. यावर्षी गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.

पौराणिक कथेनुसार, प्रभू श्रीराम या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले. 

असं मानलं जातं, की घरामध्ये गुढी उभारल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि घरात सुख-समृद्धी येते. 

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानं खाऊन दिवसाची सुरुवात केली जाते. असं म्हटलं जातं, की यामुळे रक्त शुद्ध होतं आणि शरीर मजबूत होतं. 

गुढीपाडव्यानिमित्त घरात पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड, मसालेभात, आमरस, असे वेगवेगळे प्रकारचे भाज्या, 

गुढीपाडव्याला सोनं, वाहन किंवा घराची खरेदी केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतंही काम सुरू करणं शुभ मानलं जातं.

विक्रम संवत हिंदू पंचांगानुसार, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली अशीदेखील एक धार्मिक मान्यता आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)