म्हातारा पाऊस म्हणजे काय?

पंचाग आणि पूर्वीच्या रुढी-परंपरानुसार उद्या सायंकाळपासून म्हातारा पाऊस सुरू होत आहे. गुरुवारी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी सायंकाळी 04 वाजून 55 मिनिटांनी सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश होईल. यावेळी धनू लग्न असून वाहन बेडूक आहे

ग्रह योगांचा विचार करता या नक्षत्राचा चांगल्या प्रमाणात पाऊस होण्याची चिन्हे आहेत. परंतु, म्हणावा तसा पाऊस पडण्याची शक्यता नाही.

दिनांक 20 ते 23, 27 आणि 29 ते 01 ऑगस्टला चांगला पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती पंचांगामधून सांगण्यात आली आहे.

 विशिष्ट नक्षत्राला सुरू होणाऱ्या पावसाला तरणा पाऊस, म्हातारा पाऊस, सुनेचा पाऊस तसंच सासूचा पाऊस असं म्हंटलं जातं.

गुरुवार 20 जुलै रोजी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात पडणाऱ्या पावसालाच म्हातारा पाऊस, असे म्हणतात.

पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांनी या पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणाऱ्या पावसांना गमतीशीर नावं ठेवली आहेत.

पुनर्वसु नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा पाऊस' म्हणतात. पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा पाऊस' असं म्हंटलं जातं.

आश्लेषा नक्षत्रातील पावसाचं 'आसळकाचा पाऊस' तर मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो. म्हणून मघा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘सासूंचा पाऊस' म्हणतात

महाराष्ट्रील बहुतांश ग्रामीण भागात नक्षत्र आणि वाहनावरून पाऊस कसा पडला किंवा पडेल याविषयी लोक चर्चा करतात.

सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.