शिवमहापुराण या ग्रंथात एकूण 16 प्रकारच्या रुद्राक्षांचे वर्णन करण्यात आले असून त्यांची देवता, ग्रह, राशी आणि कार्ये यांचेही स्वतंत्र वर्णन केले आहे. जाणून घ्या रुद्राक्षाचे प्रकार आणि त्याचे फायदे.
एक मुखी रुद्राक्ष हे धारण करणे कीर्ती, पैसा, यश आणि ध्यानासाठी उत्तम आहे.
दोन मुखी रुद्राक्ष हे आत्मविश्वास आणि मनःशांतीसाठी धारण केले जाते
तीन मुखी रुद्राक्ष हे मनाच्या शुद्धीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी धारण केले जाते.
चार मुखी रुद्राक्ष हे मानसिक क्षमता, एकाग्रता आणि सर्जनशीलतेसाठी धारण केले जाते.
पाच मुखी रुद्राक्ष हे ध्यान आणि आध्यात्मिक कार्यासाठी धारण केले जाते.
सहा मुखी रुद्राक्ष हे ज्ञान, बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास यासाठी धारण केले जाते.
सात मुखी रुद्राक्ष हे आर्थिक आणि करिअरच्या विकासासाठी धारण केले जाते.
आठ मुखी रुद्राक्ष करिअर मधील अडथळे आणि अडचणी दूर करण्यासाठी धारण केले जाते
नऊ मुखी रुद्राक्ष ऊर्जा, सामर्थ्य, धैर्य आणि निर्भयता मिळविण्यासाठी हे धारण केले जाते.
दहा मुखी रुद्राक्ष नकारात्मक शक्ती, वाईट नजर आणि वास्तू आणि कायदेशीर बाबींपासून संरक्षणासाठी हे धारण केले जाते.
अकरा मुखी रुद्राक्ष प्रवासादरम्यान आत्मविश्वास, निर्णय क्षमता, रागावर नियंत्रण आणि नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करण्यासाठी धारण केले जाते.
बारा मुखी रुद्राक्ष हे नाव, कीर्ती, यश, प्रशासकीय कौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी धारण केले जाते
तेरा मुखी रुद्राक्ष आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, आकर्षकता आणि तेज वाढवण्यासाठी धारण केले जाते.
चौदा मुखी रुद्राक्ष सहाव्या इंद्रियांना जागृत करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करण्याच्या उद्देशाने धारण केले जाते.
गणेश रुद्राक्ष हे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढीसाठी,
गौरी शंकर रुद्राक्ष कुटुंबात सुख-शांती, लग्नात विलंब, संतान आणि मानसिक शांती यासाठी धारण केले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)