वास्तुशास्त्रामध्ये जीवन सुलभ आणि आनंददायी बनवण्यासाठी अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत.
वास्तुशास्त्रात कपडे धुण्याचे नियम सांगण्यात आले आहेत, त्यानुसार रात्री कपडे धुणे आणि वाळवणे अशुभ मानले जाते.
पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, रात्री कपडे धुणे आणि वाळायला घातल्याने जीवनात समस्या निर्माण होतात.
वास्तुशास्त्रानुसार, रात्री कपडे धुण्याने घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होते.
कारण रात्री कपडे धुण्याने त्या कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा येते, असे मानले जाते.
त्यामुळे कामात व्यत्यय येणे किंवा सतत तणावाखाली राहणे यासारख्या समस्या येतात.
वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर उघड्या आकाशात कपडे धुवू नयेत.
रात्रीच्या वेळी कपडे सुकायला वेळ तर लागतोच, त्यामुळे त्यावर अनेक प्रकारचे जंतू-किटाणू चिकटून राहतात.
दिवसा कपडे धुऊन वाळवल्याने सूर्यप्रकाशामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यासोबत कपड्यांवर असलेले हानिकारक जंतूही नष्ट होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात घराबाहेर
Click Here