घराच्या मुख्य दारावर ही चित्रे लावणं शुभ; अकाली मृत्यूचे भय टाळून होईल मोक्ष प्राप्ती

मृत्यू हे एक त्रिकाल सत्य आहे, ज्याच्याशी प्रत्येकजण परिचित आहे. पण, अकाली मृत्यू टाळण्यासाठी सर्वजण काळजी घेत असतात. 

घरी दारावर काही प्रतीके लावल्यानं यमदूत टाळून देवाच्या आशीर्वादासाठी आपण पात्र होऊ शकतो.

दारावर भगवान विष्णूच्या शस्त्रांची चित्रे लावू शकता. देवाचे शंख, चक्र आणि वैष्णव टिळक ही अशी प्रतीके आहेत, ज्यांना घराबाहेर पाहिल्यावर यमदूतांचीही शक्ती क्षीण होते

तुम्ही भगवान शिवाचे निस्सीम भक्त असाल तर तुम्ही शंकराचे त्रिशूल आणि डमरूचे चित्रे घराच्या दारावर लावू शकता

माता दुर्गेचे भक्त दारावर मातेचे चित्र लावून यमदूतांची वाईट नजर टाळू शकतात.

यमदूतांपासून दूर राहण्यासाठी गणपतीचे भक्त घराच्या दारावर देवाचे शस्त्र अंकुश किंवा देवाचे चित्र लावू शकतात.

भगवान सूर्याचे उपासक पितळ किंवा इतर कोणतेही शुभ धातूने त्यांच्या दारावर सूर्यदेवाचे चित्र लावू शकतात.

मृत्यूनंतर आपला आत्मा इकडे-तिकडे भटकू नये आणि त्याला परमात्म्याचे परम निवास मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

मुक्ती आणि मोक्षाचा मार्ग भगवंताची आराधना आणि उपासनेतून जातो, असे म्हणतात.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.