दारात तुळशीजवळ या वस्तू असतील तर घरात कशी नांदेल लक्ष्मी? वास्तु नियम समजून घ्या
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष धार्मिक स्थान आहे. जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात तुळस असते.
तुळशीत नियमितपणे तेल-तुपाचा दिवा लावण्याची परंपरा आहे.
अनेक वेळा आपण नकळत अशा अनेक गोष्टी तुळशीच्या रोपाजवळ ठेवतो, ज्याचे आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ लागतात.
वास्तुशास्त्रानुसार चुकूनही भगवान शिव किंवा शिवलिंग तुळशीजवळ ठेवू नये.
तुळशीने गणेशाला दोन लग्नांचा शाप दिला. यामुळेच तुळशीजवळ गणेशाची मूर्ती ठेवली जात नाही किंवा गणेशाला तुळशी अर्पण केली जात नाही.
तुळशीच्या रोपाजवळ चुकूनही झाडू ठेवू नये, झाडू तुळशीच्या आसपास पडल्यानं घरात दारिद्र्य येतं.
वास्तुशास्त्रानुसार चुकूनही तुळशीच्या रोपाजवळ शूज आणि चप्पल ठेवू नयेत. असे केल्यानं लक्ष्मीचा अपमान होतो
वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ डस्टबिन कधीही ठेवू नये. तुळशीच्या रोपाभोवती घाण ठेवल्यास कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)