घरात योग्य दिशेला ठेवलेल्या वस्तू सुख-समृद्धी वाढवतात, असं मानलं जातं. त्यामुळे घरात वास्तु दोष राहत नाहीत.
वास्तूनुसार ठराविक गोष्टी ठेवल्या गेल्या नाहीत तर नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो. घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतात.
वास्तु तज्ज्ञांच्या मते, घरामध्ये बूट-चप्पल ठेवण्याबाबत काही नियम-गोष्टी सांगण्यात आले आहेत.
असे म्हटले जाते की, जर घरात शूज आणि चप्पल उलटे पडून राहिल्यास त्यामुळे नकारात्मक शक्ती वाढण्यास प्रोत्साहन मिळतं.
त्यामुळे वास्तू दोषही निर्माण होतात. घरात शूज आणि चप्पल ठेवण्याच्या वास्तू नियमांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, अस्वच्छ-घाणेरडे शूज उत्तर किंवा पूर्व दिशेला कधीही काढू नयेत. या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असल्याचे सांगितले जाते.
अस्वच्छ शूज उत्तर किंवा पूर्व दिशेला काढले तर घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होत जाते. बाहेरून येताना शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढा.
वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दारासमोर बूट आणि चप्पल काढणे अशुभ मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजात लक्ष्मीचा वास असल्याचे सांगितले जाते.
ज्योतिषशास्त्रात पायांना शनीचा कारक मानण्यात आलं आहे. त्यामुळे शनिदेवाचा प्रभाव चपलांवरही मानला जातो.
शूज आणि चप्पल उलटे पडल्याने शनी नाराज होऊ शकतो. यामुळे जीवनात समस्या वाढू शकतात.
शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सुख-शांती भंग पावते, असे मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली काही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ
Click Here