घराच्या प्रवेशद्वाराशी या गोष्टी मांगल्याचं प्रतिक!

कोणत्याही व्यक्तीला स्वतःसाठी आणि घरासाठी सुख, शांती आणि समाधान हवं असतं. यासाठी अनेक प्रकारचे उपायही केले जातात.

परंतु, अनेक उपाय करूनही लोकांना आपल्या मेहनतीचे फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्र तुम्हाला मदत करू शकते.

वास्तुशास्त्राने अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपण घराच्या प्रवेशद्वाराशी ठेवल्या तर त्यामुळे घरात सुख-समृद्धीची भरभराट होऊ शकते.

ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्याकडून वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या गोष्टींविषयी जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रवेशद्वाराशी या 4 गोष्टी असल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते, असे मानले जाते.

पूजेच्या वेळी प्रथम कलशाची स्थापना केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. कलशाची स्थापना करणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या घराच्या मुख्य दारावर कलशाचा किमान छोटा फोटो लावला पाहिजे. असे केल्याने घरात समृद्धी येते आणि घरातील संकटेही दूर होतात.

हिंदू धर्मात तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक घरात लावले जाते. तुमच्या घरातही तुळशीचे रोप असेल तर त्याला सकाळ संध्याकाळ पाणी अर्पण करावे.

भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने भगवान श्री हरी विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होतो.

घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर फुलांचा हार किंवा आंबा, पिंपळ, अशोकाच्या पानांचे तोरण बांधू शकता.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक बनवणे खूप शुभ मानले जाते. घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक लावल्याने घरामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येते

(सूचना : येथे दिलेली काही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ

Click Here