Vastu: वास्तुशास्त्रानुसार घरात या ठिकाणी चाव्या ठेवणं असतं शुभ, दिशा आहे महत्त्वाची

घरात कपाटे, घराचे दरवाजे, वाहनांच्या चाव्या ठेवण्यासाठी एक निश्चित जागा असते.

काहीवेळा चुकून चावी हरवली तर सगळ्यांचीच मोठी धावपळ होते. चावी हरवली तर वेळ जातोच आणि मानसिक ताप होतो.

वास्तुशास्त्रामध्ये घरात ठेवल्या जाणाऱ्या वस्तू कशा ठेवाव्यात याबाबत त्यांची दिशाही निश्चित करण्यात आली आहे.

वास्तुशास्त्रात असे मानले जाते की, जर चाव्या चुकीच्या पद्धतीने ठेवल्या गेल्या तर अनेक समस्या निर्माण होतात.

कोणत्याही प्रकारची चावी घराच्या ड्रॉईंग रूममध्ये ठेवू नये. कारण श्रद्धेनुसार बाहेरून येणाऱ्या लोकांची थेट नजर घराच्या चाव्यांवर पडू नये.

घराच्या देव्हाऱ्यामध्ये किंवा त्याच्या जवळ चाव्या ठेवू नयेत, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये चाव्या ठेवणे देखील शुभ नाही. किचनमध्ये चाव्या ठेवणे टाळा.

घरात चाव्या ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा शोधत असाल तर चाव्या नेहमी पश्चिम दिशेला ठेवू शकता.

चाव्या कुठेही आजूबाजूला ठेवण्याऐवजी त्यासाठी आपण एक हॅन्गर वापरू शकता.

वास्तुशास्त्रानुसार चाव्या ठेवण्यासाठी लाकडापासून बनवलेले हॅन्गर शुभ मानले जातात.