हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व आहे. दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगितलं आहे.
दान करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
दान केल्यानं इहलोकात कल्याण होतं आणि परलोकात दुःख सहन करावं लागत नाही, अस मानतात.
पण, शास्त्रात दान करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.
सूर्यास्तानंतर काही वस्तू दान करणे शुभ मानलं जात नाही.
असे केल्याने घरातून सुख-समृद्धी निघून जाऊ शकते.
शास्त्रानुसार संध्याकाळी दही आणि दूध दान करणे अशुभ मानले जाते.
सूर्यास्तानंतर दुधाचे दान केल्यानं घरात गरिबी येऊ लागते.
दूध आणि दह़्याव्यतिरिक्त संध्याकाळनंतर विशेषतः गुरुवारी हळदीचे दान करू नये.
सूर्यास्तानंतर कधीही पैसा-धन दान करू नये, कारण संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते.