घराच्या समृद्धीसाठी 'या' वस्तू घरात ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार घरात अशा काही वस्तू असतात, ज्याने घरात गरिबी येते. त्या वस्तू कोणत्या ते पाहुया...

महाभारतातील युद्धाच्या प्रसंगाची प्रतिमा घरात लावू नका. त्याने नकारात्मकता वाढते. 

ताजमहाल फोटो लावू नका. तो मकबरा आहे, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. 

घरातील भिंतीवर किंवा टेबलवर वायरांचा गुंता होऊ देऊ नका. त्याने सकारात्मक ऊर्जा कमी होते.

सुकलेली फुलंदेखील घरात ठेवू नका. कुंड्यामध्ये अशी फुलं असतील, तर ती काढून टाका. 

घरातील किचन, बाथरूम किंवा अंगणात साठलेले पाणी ठेवू नका.

घरात छत किंवा नळातून पाण्याची गळती होत असेल, तर त्वरीत दुरुस्ती करून घ्या. 

घरात बंद असलेलं घड्याळ ठेवू नका. त्याला लवकर ठीक करून घ्या. 

या वस्तू घरातून काढल्या की, घरात सकारात्मकता येते आणि समृद्धी वाढते.