किचनशी निगडित महत्वाचे वास्तू नियम

प्रत्येक घरातील स्वयंपाक घर हा एक महत्वाचा भाग असतो. 

किचनमध्ये वास्तू दोष असल्यास आयुष्यात अनेक अडथळे येऊ शकतात. 

वास्तू शास्त्रात स्वयंपाक घराशी निगडित अनेक वास्तू नियम सांगितले आहेत. 

स्वयंपाकघर नेहमी अग्नेय कोनात बनलेले हवे. 

जेवताना आपले तोंड नेहमी पूर्व दिशेला असायला हवे. 

गॅस आग्नेय दिशेला तर प्लॅटफॉर्मने पूर्व दक्षिण दिशा कव्हर करावी. 

पिण्याचे पाणी नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवावे. 

गॅस सिलेंडर नेहमी दक्षिण पूर्व दिशेला ठेवावे. 

डायनींग टेबल किचनमध्ये असेल तर दक्षिण पूर्व दिशेला ठेवावा.