कशी राहणार घरात सुख-शांती? तुमच्या मुख्य दरवाजासमोरच असतील या गोष्टी
मुख्य दरवाज्याच्या बरोबर समोर झाड लावू नये, रोग-राई, संततीतील दोष वाढतील.
मुख्यद्वारासमोरून सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे फालतू खर्च आणि विविध आपत्ती घडतात.
एखादा खांब असण्याने स्त्रियांमध्ये दोष, गृहस्थाचा मृत्यू आणि दुर्भाग्य येते.
ध्वज असल्याने संपत्ती नाश आणि रोग-राईचा प्रभाव होतो. भिंत असल्यास गरिबी येते.
दुसऱ्या घराचा दरवाजा मुख्य दरवाजासमोर असेल तर धनाचा नाश होतो.
विहीर असल्यास रोग, भय व अडचणी येण्याची शक्यता असते.
मुख्य दरवाजासमोर खडक असल्यास शत्रुत्व व मुतखड्यासारखे आजार होण्याची शक्यता असते.
मुख्य दरवाजासमोर दुसऱ्या घराचा कोपरा असेल तर दुर्दैव आणि मृत्यूची भीती असते.
घराची उंची समोरील रस्त्यापेक्षा उंच ठेवल्यास काही दोष राहत नाहीत.
या वेधवस्तु घरासमोर नसून घराच्या आजूबाजूला मागे असतील तर त्याचा प्रभावही संपतो