वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर तर होतोच, पण त्याचा परिणाम कुटुंबातील लोकांच्या आरोग्यावरही होतो.
महागडे डॉक्टर आणि अनेक प्रकारचे उपाय करूनही काही रोग पाठलाग सोडत नसल्याचे अनेकवेळा दिसून येते.
हे तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीसोबत होत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सारखं आजारपण येणं, कोणाच्यातरी तब्येतीची सतत कुरबुर असणं हे सर्व घरातील वास्तुदोषामुळेही होऊ शकते, असे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात जिना किंवा शौचालय असेल तर ते आजच दुरुस्त करा.
कारण यामुळे घरातील सदस्यांसह घरातील प्रमुख महिलेला मानसिक तणाव आणि मेंदूशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
- वास्तुशास्त्रात असे मानले जाते की, जर घरातील स्त्रीने अन्न शिजवताना दक्षिणेकडे तोंड केले तर अशा स्थितीत तिला पाठदुखी, ग्रीवा, सांधेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने मायग्रेन, सायनस आणि डोकेदुखीचे आजार होऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, पलंगाच्या समोर आरसा असल्यामुळे झोपेत असताना आरशात त्याची प्रतिमा दिसल्यास माणूस हळूहळू आजारी पडू लागतो.
- वास्तुशास्त्रात असे मानले जाते की, घराच्या उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशा बंद करणे, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम दिशा उघडल्याने घरासाठी गंभीर वास्तुदोष निर्माण होतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here