या दिवशी लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; या राशींसाठी आव्हानात्मक असेल काळ
या वर्षी एकूण 4 ग्रहणे होणार आहेत, त्यापैकी 2 सूर्यग्रहण असतील आणि उर्वरित 2 चंद्रग्रहण असतील.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात होणार आहे. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते.
ज्यामुळे पृथ्वी दिवसा काही मिनिटे किंवा तासांपर्यंत अंधारमय होते.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा प्रभाव वेगवेगळ्या राशीच्या लोकांवरही पडतो. त्यामध्ये सुतक कालावधीही महत्त्वाचा असतो.
2023 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 07.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होणार आहे.
भारतातून पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण फक्त ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर, दक्षिण आशिया, प्रशांत महासागर आणि पूर्व आशियामधून पाहता येईल.
हे सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालही वैध ठरणार नाही.
सुतक कालावधी सुरू झाल्यावर लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण काही राशीच्या लोकांसाठी नकारात्मक किंवा अशुभ सिद्ध होऊ शकते.
मेष, मकर, कन्या आणि सिंह राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचे अशुभ परिणाम सोसावे लागू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)