श्रावणात स्वप्नात साप दिसण्याचा अर्थ?
हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय विशेष मानला जातो. श्रावण महिना भगवान भोलेनाथांचा आवडता महिना मानला जातो
श्रावण महिन्यात एखाद्याला स्वप्नात साप दिसला तर ते सर्वसाधापण स्वप्न नाही.
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात साप पाहण्याचा अर्थ त्याच्या रंग आणि स्थितीवर अवलंबून असतो.
श्रावणात स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर स्वप्न शास्त्रानुसार तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्याचा तो संकेत आहे.
याशिवाय हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. व्यवसाय आणि नोकरीत बढती मिळू शकते.
स्वप्नात पिवळ्या रंगाचा साप दिसला तर याचा अर्थ तुम्हाला राहण्यासाठी घरापासून दूर जावे लागेल.
स्वप्नात स्वतःला साप पकडताना पाहिले तर हे स्वप्न तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते.
हे स्वप्न सूचित करते की तुम्हाला अचानक कुठूनतरी आर्थिक लाभ मिळू शकतो.
एखाद्या व्यक्तीला सोनेरी किंवा पांढरा साप दिसला तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)