वास्तुशास्त्रानुसार केळीचं झाडं म्हणजे लखलाभ! या उपायांनी दिसेल कामांवर परिणाम
काही झाडे आणि वनस्पती अशा आहेत, ज्यांना हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते.
यामध्ये तुळशीचे झाड, पिंपळाचे झाड, आवळा, केळीचे झाड इ. हिंदू धर्मात या झाडांची पूजा करणे लाभदायी असल्याचे सांगितले जाते.
केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि केळीच्या पान-मुळांमध्ये गुरु ग्रह वास करतो, असे मानले जाते.
विशेषत: गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा विधीपूर्वक केल्यास व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात.
तुमच्या घरात केळीचे झाड योग्य दिशेला लावले तर तुम्हाला जीवनात कधीही दुःख आणि गरिबीचा सामना करावा लागणार नाही.
हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यानं जीवनातील आर्थिक समस्या नाहीशा होतात.
केळीच्या झाडाचं छोटंस मुळ न काही बोलता घरात आणून ठेवा. यानंतर गंगेच्या पाण्याने धुवून त्यावर पिवळा धागा बांधावा.
केळीचे हे मूळ घराच्या तिजोरीत किंवा संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. असे मानले जाते की, हा उपाय गुरुवारी केल्यास जास्त फायदा होतो.
गुरुवारी स्नान करून झाल्यावर पिवळ्या रंगाचे कपडे घालून केळीच्या झाडाजवळ जाऊन तुमची इच्छा सांगा.
असे करण्यासाठी जात असताना तुम्हाला कोणीही अडवू नये, हे लक्षात ठेवा. यामुळे आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात, असा धार्मिक विश्वास आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)