मोरपीस घरात ठेवावे की ठेवू नये ?
मान्यता आहे की विना मोर पंख भगवान कृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते.
भगवान शिवचे पुत्र कार्तिकेय, देवी सरस्वती आणि इंद्रदेव यांचं वाहनही मोर आहे.
आपल्या ऋषी मुनींनी अनेक ग्रंथ मोर पंखाने लिहिले आहेत.
वास्तूशास्त्रानुसार घरात मोर पंख ठेवल्याने घरात सुख-समृद्धि येते.
मोराचा पंख पुस्तकात ठेवणे चांगलं असतं.
पुस्तकात मोराचा पंख ठेवावा असं केल्याने एकग्रता वाढते .
मोर पंख घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा राहाते.
जर पती-पत्नीच्या नात्यात तणाव असेल तर घराच्या बेडरुममध्ये मोर पंख ठेवावे
त्यामुळे नक्कीच मोरपीस आपल्या घरात ठेवणे शुभ आहे .