एखादा जाणकार व्यक्ती समोरच्या माणसाच्या शरीराची रचना पाहून त्याचा स्वभाव आणि भविष्य याबद्दल बरेच काही सांगू शकतो
प्रत्येक माणसाची शरीररचना वेगळी असते. परंतु, सामुद्रिकशास्त्रात नमूद केलेल्या भौतिक रचनेच्या आधारे माणसाबद्दल अचूक माहिती मिळू शकते.
सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की, ज्या लोकांची नखे लांबसडक असतात, त्यांच्यात सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती जास्त असते.
असे लोक त्यांच्या सर्जनशील कार्यशैलीमुळे खूप नाव कमावतात. हे लोक जे काही करतात ते उत्साहाने आणि आनंदाने करतात.
ज्या लोकांची नखे गोलाकार किंवा अंडाकृती असतात, असे लोक स्वभावाने अनुकूल मानले जातात.
हे लोक आपल्या दिलदार आणि आनंददायी वागण्याने इतर लोकांना पटकन आपले बनवतात. या लोकांच्या शब्दांचा इतर लोकांवर खूप प्रभाव पडतो.
समुद्रशास्त्रात असे मानले जाते की, रुंद नखे असलेले लोक बुद्धीने चालाक असतात. हे लोक आपली सर्व काम विचार करून करतात, ज्यामुळे ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात.
पिवळी नखे असलेल्या लोकांना गरिबीचा सामना करावा लागू शकतो. पिवळे नखे असलेले लोक त्यांचे बहुतेक आयुष्य गरिबीत घालवतात.
ज्यांची नखे वाकडी-तिकडी, कोरडी आणि बोटाकडे झुकलेली असतात, त्यांचे आयुष्य दुःखात व्यतीत होते
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here