अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला

31 जानेवारी रोजी पहाटे 02.46 वाजता शनि कुंभ राशीमध्ये अस्ताला जाईल.

31 जानेवारीला शनि अस्तामुळे काही राशीच्या लोकांना सावध राहून काम करावं लागेल.

आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शनीच्या अस्तामुळे या 5 राशींच्या जीवनावर काय परिणाम होतील ते जाणून घेऊया.

मेष: या राशीच्या लोकांना शनीच्या अस्तामुळे करिअर आणि वैवाहिक जीवनात सतर्क राहावे लागेल. धनहानी होऊ शकते.

कर्क : काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या राशीच्या लोकांनी अनावश्यक चर्चा आणि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे. 

सिंह : शनीच्या अस्ताचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक: शनीच्या अस्तामुळे तुमच्या कुटुंबातील नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. भाऊ-बहिणीचे नाते बिघडू शकते.

कुंभ - सध्या तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका, तुम्ही जिथे असाल तिथे मेहनत करा. दबावाखाली नोकरी सोडू नका.

यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे, कौटुंबिक संबंध आणि वैवाहिक जीवन दोन्ही प्रभावित होऊ शकतात. 

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.