एखाद्या व्यक्तीच्या काही वाईट सवयींमुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते. 

अशा व्यक्तींना नेहमी पैशांची चणचण सोसावी लागते.

म्हणूनच नेहमी नम्र राहा आणि लहान-मोठ्या प्रत्येकाशी आदराने वागा. 

जे लोक अस्वच्छ राहतात आणि घाणेरडे जीवन जगतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी असंतुष्ट राहते.

म्हणूनच आपण रोज आंघोळ करावी, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि स्वच्छ कपडे घाला. 

रात्री उशिरा झोपणे, सूर्योदयानंतरही झोपून राहणाऱ्यांना आयुष्यात कधीही सुख, यश, समृद्धी, उत्तम आरोग्य मिळू शकत नाही. 

तसेच सूर्यास्ताच्या वेळी झोपणाऱ्या लोकांवरही माता लक्ष्मीचा कोप होतो. ती अशा घरांमध्ये कधीच राहत नाही.

 संध्याकाळी कधीही झोपू नये, कारण ही वेळ घरात देवी लक्ष्मीच्या आगमनाची असते.

अशा गोष्टी माणसाच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पाडतात, त्यामुळे आर्थिक चणतणही ते सहन करतात.

सूचना - येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.