'जय कुतिया महारानी मां' चे अनोखे मंदिर 

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये हे एक छोटेसे मंदिर आहे, ज्यावर 'जय कुतिया मां' असे लिहिले आहे.

जय कुतिया महारानी मां' अनोखे मंदिर.   आश्चर्यचकित होऊ नका, हे वास्तव आहे.

मऊरानीपुर मध्ये रेवन व ककवारा या गावाच्या सीमेवर हे एक छोटेसे मंदिर आहे. 

 या दोन्ही गावात एक कुत्री राहायची असे येथील लोक सांगतात.

 ती कुत्री कोणत्याही शुभ प्रसंगात जेवणासाठी पोहचायची .

 एकदा दोन्ही गावात कुत्री जेवण करण्यासाठी कार्यक्रमात गेली 

पण दोन्ही ठिकाणी जेवण संपले होते. जेवण न मिळाल्याने भुकेने ती मेली

दोन्ही गावातील लोकांना हे कळताच खूप वाईट वाटलं. 

म्हणून त्यांनी दोन्ही गावाच्या सीमेवर त्या कुत्रीच एक मंदिर बांधल 

आता परंपरा अशी आहे की जवळच्या गावात एखादा कार्यक्रम असेल तर लोक या मंदिरात जाऊन अन्नदान करतात.