घराच्या भरभरासाठी लाल गुलाब अत्यंत महत्त्वाचा

गुलाब प्रेमाचं प्रतिक आहे. पण, घराच्या समृद्धी गुलाब फुलानेदेखील होते.

शुक्ल पक्षच्या पूर्वी मंगळवारी 11 गुलाबाची फुलं हनुमानाला अर्पण करा. त्याने मनातील इच्छा पूर्ण होते. 

मंगळवारपासून 40 दिवस रोज हनुमान मंदिरात जा आणि गुलाब अर्पण करा. त्याने नोकरी लवकर लागते. 

मंगळवारी लाल चंदन, लाल गुलाब आणि कुंकू लाल कापडात बांधा आणि मंदिरात एका आठवड्यांसाठी ठेवा. त्यानंतर ते घेऊन घरातील तिजोरीत ठेवा. आर्थिक समृद्धी वाढू शकते. 

लहान बाळ आजारी असेल तर, एका खाऊच्या पानात बुंदी लाडू, पाच गुलाब ठेवून 7 वेळा बाळाची नजर काढा आणि मंदिरात ठेवून या. 

पौर्णिमेदिवशी अंघोळीनंतर 3 गुलाब आणि 3 चमेलीची फुलं नदीत विसर्जित करा. 5 पौर्णिमेपर्यंत हे करा आणि अडलेली काम पूर्ण होतील.

खाऊच्या पानात 7 गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि त्याला दुर्गामातेला अर्पण करा. याने धनप्राप्ती होईल. 

गुलाब आणि दुधाने लक्ष्मीची उपासना करायला हवी. 

त्याचबरोबर शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन गुलाब अर्पण करायला हवे.