देशातील या बँकेत रामाच्या नावानं मिळतं कर्ज; पॅन क्रमांकाप्रमाणेच एक राम क्रमांक आणि..
एक अनोखी बँक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. विशेष बाब म्हणजे या बँकेला कधीही कुलूप लावलं जात नाही.
विशेष म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातही या बँकेच्या शाखा तुम्हाला पाहायला मिळतील.
'रामनाम बँक' असं या बँकेचं नाव आहे. या बँकेत मोफत खातं उघडता येतं.
संकटाच्या काळात रामाच्या नावानं कर्जही दिलं जातं.प्रयागराजच्या संगमावर दरवर्षी माघ मेळ्यात या बँकेचं शिबिर आयोजित केलं जातं.
'राम नाम बँक सेवा' नावाची संस्था या बँकेचा कारभार बघते.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आशुतोष वार्ष्णेय सांगतात की, राम बँक ही शतकानुशतके जुनी संकल्पना आहे.
ज्या व्यक्ती राम नामाच्या पासबुकमध्ये रामाचं नाव लिहितात त्यांना मोफत पासबुक दिलं जातं.
हिंदू धर्मातील पुराणांनुसार, रामाचं नाव लिहिल्यास सुख-शांती मिळते. ग्रह आपल्यासाठी अनुकूल होतात.
भक्ताचं या बँकेत खातं उघडलं जातं तेव्हा त्याला पॅन क्रमांकाप्रमाणेच एक राम क्रमांक दिला जातो.
माघ मेळ्यात महिनाभर उपवास करणाऱ्या व्यक्तींना येथे रामाच्या नावावर 1.25 लाख रुपयांचं कर्ज मिळतं.
प्रयागराज शहरात असलेल्या या राम नाम बँक सेवा संस्थेची एक वेबसाइट आहे.
जेव्हा लोक परदेशातून येतात तेव्हा ते त्यांच्याकडे असलेल्या रामनामाच्या हार्ड कॉपी, हार्ड डिस्क पेन ड्राईव्हमध्ये येथे जमा करतात.