अंगणातील नारळाच्या झाडाचं महत्त्व

हिंदू धर्मात नारळाचं झाड शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. याशिवाय हिंदू धर्मातील बहुतांश पूजांमध्ये नारळाचं पूजन केलं जातं. 

 हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ असं नाव आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नारळाच्या झाडावर देवी लक्ष्मीचा वास असतो.

वास्तुशास्त्रामध्ये नारळाचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते उपाय योग्यप्रकारे केल्यास व्यक्ती आपलं नशीब बदलू शकते.

वास्तूनुसार, ज्या घर-परिसरात नारळाचं झाड लावलं जातं त्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील तर त्या व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचं झाड लावावं.

अंगणाच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला नारळाचं झाड लावणं नेहमीच शुभ मानलं जातं.

नारळात अनेक प्रकारचे प्रोटिन्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळतात, असं मेडिकल सायन्स सांगतं.

 नारळात पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम आणि अनेक प्रकारचे मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात.

 नारळापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात.  नारळाचे वास्तूशास्त्रानुसार आणि मेडिकल सायन्सनुसार अनेक फायदे आहेत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात घराबाहेर

Click Here