घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; वास्तुशास्त्रात सांगितलेत त्यावर उपाय

ज्योतिषशास्त्रात मृत पूर्वजांची नाराजी अशुभ मानली गेली आहे.

असे मानले जाते की, पूर्वज अशांत असतील तर त्यांच्या कोपामुळे कुटुंबातील लोकांचे आयुष्य विस्कळीत होते.

कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

वैवाहिक जीवनात तणाव, आर्थिक समस्या आणि मुलांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागते.

वास्तुशास्त्रानुसार, असे कोणते संकेत आहेत, ज्यावरून समजू शकतं की, आपले पूर्वज अशांत-नाराज आहेत.

अशा परिस्थितीत काय करणे योग्य मानले जाते याबद्दल अधिक जाणून घेऊया.

शास्त्रानुसार, घरात, बाहेरील भिंतीवर पिंपळाचे झाड उगवणे अशुभ मानले जाते.

घरामध्ये पिंपळाचे झाड पुन्हा पुन्हा उगवत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण मानले जाते. मृत पूर्वज  तुमच्यावर नाराज असल्याचा तो संकेत समजावा.

यावर उपाय म्हणजे कोणत्याही सोमवारी पिंपळाचे झाड मुळांसह उपटून नदीत फेकून द्यावे. 

तसेच अमावस्येच्या दिवशी गरिबांना दान करा. शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा.

असं केल्यानं मृत पितर सुखी होतात. परिणामी पितृदोषापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)