पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे

आणखी पाहा...!

रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरापासून झाली, असे मानले जाते. 

एक मुखी, दोन मुखी, पाच मुखी असे अनेक प्रकारचे रुद्राक्ष आहेत, यामध्ये पंचमुखी रुद्राक्षाचे विशेष महत्त्व मानले जाते.

रुद्राक्ष धारण करण्याचे कित्येक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. रुद्राक्ष हे सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

 रुद्राक्ष धारण केल्याने महादेवाची कृपा व्यक्तीवर राहते, असे मानले जाते. जाणून घेऊया पंचमुखी रुद्राक्षाचे फायदे आणि ते धारण करण्याची पद्धत.

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, पंचमुखी रुद्राक्ष हे भगवान शिवाच्या 5 रूपांचे प्रतीक आहे.

मानवाचे शरीर अग्नि, जल, वायु, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पंचमुखी रुद्राक्षामुळे व्यक्तीच्या शरीरातील ही पाचही तत्वे नियंत्रणात राहतात.

पंचमुखी रुद्राक्ष गुरू ग्रहाचे अशुभ प्रभाव नाहीसे करते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीची एकाग्रता शक्ती वाढते. 

प्रकृती उत्तम राहते. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते.

ज्योतिषांच्या मते सोमवार किंवा गुरुवारी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)