सुपर टॅलेंटेड लोकांच्या जन्मतारखेत हा अंक असतो

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून व्यक्तीचं भविष्य वर्तवलं जातं.

जन्मतारखेच्या आकड्यांची बेरीज करून जो अंक येतो, त्याला जन्मांक असं म्हटलं जातं. जन्मांक किती आहे, त्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधता येतो.

ज्या व्यक्तींच्या जन्म तारखेमध्ये 3 हा अंक आहे त्या सुपर टॅलेंटेड असतात. त्यांना आपली प्रतिभा कशी दाखवायची आणि कशी वापरायची हेदेखील माहिती असतं.

त्यांचा स्वभाव लवचिक असतो आणि त्या कितीही विचित्र परिस्थितीतसुद्धा काम करू शकतात. 3 ही संख्या स्वतः गुरू ग्रहाशी संबंधित आहे.

या संख्येशी संबधित असलेल्या व्यक्तींना त्यांचे गुरू, आई, शिक्षक, प्रशिक्षक आणि शिक्षक यांचा सतत आशीर्वाद मिळतो.

जन्मतारखेमध्ये 3 हा अंक असलेल्या व्यक्ती आकर्षणाचं केंद्र, विचारवंत, अत्यंत प्रतिभावान असतात. त्यांच्याकडे मोठा शब्दसंग्रह आणि जिज्ञासू मन असतं. 

या अंकाच्या व्यकती महत्त्वाकांक्षी, मनमिळाऊ, सर्जनशीलतेची आवड असलेल्या, तार्किक निर्णय घेणाऱ्या, आध्यात्मिक, आनंद देणाऱ्या असतात.

जन्मतारखेमध्ये 3 हा अंक असलेल्या व्यक्तींमधली ऊर्जा विखुरलेली असू शकते. अशा व्यक्ती लोकांवर खूप सहज विश्वास ठेवतात.

या व्यक्तींनी जीवनात एकच प्रमुख उद्दिष्ट निश्चित करणं आवश्यक आहे, नातेसंबंधांमध्ये खूप भावनिक दृष्टिकोन असतो. 

जन्मतारखेमध्ये 3 हा अंक असलेल्या व्यक्ती डिझायनर, शिक्षक, कंटेंट रायटर, कलाकार, सीए, सीए, संगीतकार म्हणून चांगलं काम करू शकतात. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)