घरातील जुना झाडू फेकताना होणाऱ्या चुका टाळा; योग्य दिवस आणि नियम जाणून घ्या
हिंदू धर्मात झाडूचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहे. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.
यामुळेच घरात झाडू ठेवण्यासोबतच तो जुना किंवा खराब झाल्यानंतर फेकताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे.
जुना झाडू घराबाहेर चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या दिवशी फेकल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात गरिबी येऊ शकते.
ज्योतिषशास्त्रात जुना झाडू फेकण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवार आणि गुरुवारी जुना झाडू कधीही घराबाहेर टाकू नये. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते.
झाडू कितीही जुना किंवा खराब झाला असला तरी तो कधीही नाल्यासारख्या अस्वच्छ जागेजवळ फेकू नका.
जुना झाडू फेकण्यासाठी शक्यतो अशी जागा निवडा जिथे कोणाच्या पायांचा स्पर्श होणार नाही.
झाडू नेहमी कशात तरी गुंडाळून फेकून द्या, म्हणजे लपवून फेकून द्यावा.
झाडू जुना झाल्यावर तो जाळू नये. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.
जुना झाडू फेकण्यासाठी अमावस्या आणि शनिवार शुभ मानला जातो.
शास्त्रानुसार या दिवशी जुने झाडू फेकल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)