माणसाचं सुखी जीवन बघता-बघता कंगाल करतात या सवयी; आपल्यातून करा हद्दपार

गरुड पुराणानुसार, व्यक्तीच्या काही सवयी अशा असतात, ज्यामुळे तो गरीब आणि लाचार होऊ शकतो. 

गरुड पुराणात सांगितले आहे की, लोभ फार वाईट आहे. लोभीपणा एखाद्या व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करू शकतो.

लोभी व्यक्ती अधिकच्या हव्यासापोटी वाईट कृत्ये करण्यास मागेपुढे पाहत नाही, पण, कमावलेला पैसा फार काळ टिकत नाही.

अहंकार माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि त्याला सर्व लोकांपासून दूर करतो. 

जी व्यक्ती आपल्यापेक्षा गरीब किंवा कमकुवत लोकांचे शोषण करते, ती व्यक्ती आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही.

अशा लोकांचे शोषण करून जे पैसे कमावतात, त्यांचा पैसा वाया जातो आणि हळूहळू त्यांची कमावलेली सर्व संपत्तीही नष्ट होते.

गरुड पुराणानुसार ज्या घरात अस्वच्छता असते, त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही.

माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. गरुड पुराणानुसार घाणेरडे कपडे गरीबी आणतात.

काही लोकांना चालताना पाय घासत किंवा ओढण्याची सवय असते, पण ही सवय तुम्हाला गरीब बनवू शकते.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.