पैसे मोजताना तुमच्याकडूनही होते का अशी चूक? सुख-श्रीमंती वाऱ्यावर जाईल उडून

नोटा मोजताना कधीही बोटांना थुंकी लावून मोजू नका. यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो, असे मानले जाते.

त्याऐवजी नोटा मोजताना पाणी किंवा पावडरचा वापर करावा.

कोणत्याही गरजू किंवा गरीबालाही पैसे देताना नीट आणि सन्मानाने दिले पाहिजेत. पैसे फेकून दिल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते.

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही ज्या पर्स किंवा पाकिटामध्ये पैसे ठेवत आहात, त्यात अन्नपदार्थ कधीही ठेवू नयेत.

पलंगाच्या बाजूला किंवा पलंगाच्या उशाशी कधीही पैसा ठेवू नयेत.

देवी लक्ष्मीच्या पैशांना नेहमी व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवणे नेहमीच शुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी पैशामध्ये वास करते, त्यामुळे पैशांचा आपल्याकडून कधी ही अनादर होऊ देऊ नये.

जेव्हाही तुम्हाला रस्त्यावर किंवा कुठेही पैसे पडलेले दिसतील, तेव्हा ते उचलून त्याला नमन करायला विसरू नका.

स्वच्छ आणि नीटनेटक्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात घाण असते, माता तेथून निघून जाते, असे मानले जाते.