नवीन कार्यासाठी खास आहे मार्च महिना, जाणून घ्या, या महिन्यात गृह प्रवेशासाठी शुभ मुहूर्त

 हिंदू धर्मासाठी मार्च महिना खूप खास आहे. कारण या महिन्यात हिंदू नववर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहाने होत आहे. या महिन्यात अनेक शुभ कार्ये करणे फायदेशीर ठरेल

जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधले असेल आणि या महिन्यात गृहप्रवेशाची योजना आखत असाल तर नक्कीच शुभ मुहूर्ताची काळजी घ्या.

असे केल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते

गृह प्रवेश मुहूर्त मार्च 2023  01 मार्च 2023, बुधवार- सकाळी 06.47 ते 09.52 पर्यंत.

08 मार्च 2023, बुधवार - सकाळी 06:39 ते 9 मार्च पहाटे 04:20 पर्यंत.

09 मार्च 2023, गुरुवार - पहाटे 05:57 ते 10 मार्च सकाळी 06:37 पर्यंत

10 मार्च 2023, शुक्रवार - सकाळी 06:37 ते रात्री 09:42 पर्यंत.

13 मार्च 2023, सोमवार - रात्री 09:27 ते 14 मार्च सकाळी 06:33 पर्यंत.

16 मार्च 2023, गुरुवार - पहाटे 04:47  ते 17 मार्च सकाळी 06:29 पर्यंत.

17 मार्च 2023, शुक्रवार - सकाळी 06:29 ते 18 मार्च उत्तर रात्री 02:46 पर्यंत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)