या वर्षी काय देऊ गं हळदी कुंकू वाण ?
हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२३ मध्ये मकर संक्रांती रविवारी १५ जानेवारी रोजी साजरी केली जाईल.
महिलांचा सर्वात आवडता सण म्हणजे मकर संक्रांत
यादिवशी सुगड पुजण्यापासून ते मकर संक्रांत सुरु झाल्यानंतर १५ दिवस हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरु होतो.
हळदीकुंकूला देण्यात येणारे वाण नेमके काय द्द्यावं ? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो.
वृक्ष संवर्धन करण्यासाठी आपण वाण म्हणून झाडांची रोपे, झाडांचे स्टँड, गार्डन मटेरियल देऊ शकतो.
किचन मधील उपयुक्त वस्तु :
कप बशी, ज्यूसर, मातीची भांडी.
मेकअप सामान: मिनी मेकअप बॉक्स, लिपस्टिक, हँड क्रीम, अत्तर, परफ्यूम
देवपूजेचे समान: हळदी-कुंकू कोयरी , निरांजन, पूजा करण्यासाठी आसन
रॉयल वाण मध्ये: चांदीच लक्ष्मी कॉईन, चांदीच निरांजन, चांदीची हळदी-कुंकू कोयरी,चांदीची फुले.
साडी, नथ,१ ग्रॅम सोन्याचा दागिना, घडयाळही देऊ शकतो