14 की 15 जानेवारी? यंदा कधी आहे मकर संक्रांती?
मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात खूप खास मानला जातो.
पौष महिन्यातील हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे.
मकर संक्रातीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.
मकर संक्रातीपासूनच सूर्याचे उत्तरायण देखील सुरू होते.
यंदा मकर संक्रांती तिथी 14 जानेवारीला रात्री 08.43 वाजता सुरू होईल.
उदयतिथीनुसार 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल.
15 जानेवारीला सकाळी 06:47 ते संध्याकाळी 05:40 पर्यंत शुभ मुहूर्त असेल.
या दिवशी तीळ, गुळापासून बनवलेली मिठाई दान केली जाते.
या दिवशी एखाद्या गरीबाला भाडी आणि तीळ दान केल्याने शनी दोष दूर होतात.