माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते.
गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी आणि वरद तील कुंड चतुर्थी असेही म्हणतात.
या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते आणि बाप्पाला आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात.
मनोभावे केलेल्या भक्तीनं बाप्पा प्रसन्न होतात, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि विघ्न हरतात, अशी श्रद्धा आहे.
यंदा गणेश जयंतीला रवियोग, शिवयोग आणि परिघ योग तयार होत आहेत.
25 जानेवारी रोजी गणेश जयंतीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.29 ते दुपारी 12.34 पर्यंत आहे
या दिवशी तुम्हाला गणेश पूजेसाठी एक तासापेक्षा जास्त शुभ मुहूर्त मिळेल.
गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी 09.54 ते रात्री 09.55 पर्यंत चंद्रदर्शन निषिद्ध आहे. यामुळे दिवसा गणेशाची पूजा करतात.
यंदा गणेश जयंतीला तीन योग जुळून आले आहेत. परिघ योग, शिवयोग आणि रवि योग
25 जानेवारी रोजी पंचक संपूर्ण दिवस आहे आणि भद्रकाळ सकाळी 07:13 ते दुपारी 12:34 पर्यंत आहे. मात्र, यामध्ये पूजेवर कोणतेही बंधन नाही.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.