या वर्षातील पहिले सूर्य आणि चंद्रग्रहण यापूर्वीच झाले आहे. आता वर्षातील दुसरे सूर्य-चंद्र ग्रहण लवकरच होणार आहे.
ज्योतिषांच्या मते, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्य-चंद्रग्रहण ऑक्टोबरमध्ये होणार आहे. दोन्ही ग्रहणांमध्ये 15 दिवसांचे अंतर असेल.
ऑक्टोबरमध्ये सूर्यग्रहण भाद्रपद अमावस्येला होणार आहे. तर अश्विन (कोजागिरी) पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे.
या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8.34 वाजता सुरू होईल. हे ग्रहण सुमारे 6 तासांनंतर 15 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.25 वाजता संपेल.
हे सूर्यग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात होणार आहे. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणजे भारतात त्याचा सूतक काळ असणार नाही.
चंद्रग्रहण कोजागिरी पौर्णिमेदिवशी म्हणजे 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 01:06 ते 02:22 पर्यंत राहील. हे ग्रहण भारतात पाहता येणार आहे.
ज्योतिषांच्या मते, 28 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी, म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.52 वाजता, भारतात ग्रहणाचा सूतक कालावधी सुरू होईल.
रात्री उशिरा चंद्रग्रहण संपेल तेव्हाच सूतक कालावधी संपेल. या प्रकारच्या सूतक काळात शुभ कार्ये करायची नसतात.
सूतक कालावधी चालू असताना गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये, असे सांगितले जाते. शक्य असल्यास या दरम्यान, झोपणे देखील टाळावे आहे.
सूतक काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. देव्हाऱ्यावर पडदा झाकला जातो, या काळात पूजाही केली जात नाही.
(सूचना : येथे दिलेली काही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ
Click Here