16 तारखेपासून लागणार खरमास

महिनाभर शुभ कार्यांसाठी नाही मिळणार मुहूर्त

16 मार्च 2023 पासून हिंदू मान्यतेनुसार विवाहांना मुहूर्त मिळणार नाहीत. 

याकाळात घराची पायाभरणी किंवा मालमत्ता खरेदी करण्यासही शुभ काळ नाही.

16 मार्चपासून एक महिन्याचा संपूर्ण कालावधी खरमास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो.

 या काळात धार्मिक विधी करू नयेत. तथापि, दैनंदिन विधी केले जाऊ शकतात. 

वैवाहिक कार्यांव्यतिरिक्त गृहप्रवेश, मुंडन, बाळांचे कान टोचण्याचे विधी यासह इतर शुभ कार्ये 20 एप्रिलनंतर सुरू होतील.

खरमासमधल्या खर याचा अर्थ वाईट असा होतो आणि मास म्हणजे महिना असा

सूर्य जोवर मकर राशीत प्रवेश करत नाही तोवर कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)